धाकटी पंढरीचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करणार - राजश्री घुले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र वरुर बुद्रुक येथील स्वयंभू विठ्ठल रुख्मिणी मंदीराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी दिली. आषाढी एकादशी निमीत्त सौ. घुले यांनी वरूर येथील स्वयंभू विठ्ठल रुख्मिणीच्या दर्शनानंतर भाविक व ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

वरूर बुद्रुक येथील स्वयंभू विठ्ठल रुख्मिणी मंदीर परिसरात मंगळवारी सकाळ पासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. सौ. घुले म्हणाल्या, की राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी धाकटी पंढरी देवस्थानचा तीर्थक्षेत्र योजनेत समावेश होण्यासाठी प्रस्ताव या पुर्वीच दिला असून त्याचा पाठपुरावा आपण करणार आहोत. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या बळीराजाची शासनाने संपुर्ण कर्जमाफी केली पाहिजे, अशी मागणी करत चांगला पाऊस पाडून बळीराजाला सुखात ठेव , असे साकडे त्यांनी या वेळी विठूरायाला घातले.
सकाळी सकाळी विठ्ठल रुख्मिणीच्या मुर्तीस पैठणहून कावडीने आणलेल्या गंगाजलाने स्नान घालण्यात आले. देवस्थानचे प्रमुख दिनकर महाराज अंचवले यांच्या हस्ते आरती कऱण्यात आली. दुपारी नगरप्रदक्षिणेत यादवबाबा भक्ति पिठाच्या वारक-यांनी पांडूरंग विदयालयाच्या प्रांगणात नेत्रदिपक रिंगण केले. रात्री अंचवले महाराजांचे किर्तन झाले. 

येणा-या भाविकांसाठी माऊली दुध संकलन केंद्र, अजिंक्य फौंडेशन, समर्थ युवा ग्रुप, द्रेाणाज ग्रुप, पहिलवान एकलव्य ग्रुपचे संतोष जाधव, जयस्तु मराठा प्रतिष्ठाण व युवक, रोटरीच्या इनरव्हील क्लबच्या वतीने फराळ, केळी व पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. माळेगाव ने येथील महादेव देवस्थानचे बाबा वाकडे व शेवगाव येथून महेश महाराज हरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे , युवक राष्ट्रवादीचे जिल्हाकार्याध्यक्ष संजय कोळगे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन आदींनी दर्शन घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.