पिकांचे पंचनामे करून दुबार पेरणीसाठी बियाणे व खते शेतक-यांना द्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यात पावसाने महिनाभर दडी मारल्याने यंदाच्या खरीप हंगामात पेरणी झालेल्या पिकांचे नकसान झाले असून दुबार पेरणी करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. अशा नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत महसूल विभागामार्फत त्वरीत पंचनामे करून दुबार पेरणीसाठी शासनाने मोफत बियाणे व खते पुरवावीत अशी मागणी शेवगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास पुढील आठवड्यात बुधवारी ( दि. 20 जुलै ) रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. 


पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी ( दि. 11 ) रोजी शेवगावचे तहसिलदार दीपक पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नी निवेदन देत चर्चा केली. या वेळी ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे, बाजार समितीचे संचालक संजय कोळगे, पंडीत भोसले, एजाज काझी, एकनाथ काळे, पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी नेमाणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, ताहेर पटेल आदी उपस्थित होते. 

 यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीला पाऊस झाल्यावर तालुक्यात शेतक-यांनी उधर उसनवारी करून प्रसंगी खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन मोठ्या आशेने कपाशीसह , बाजरी, तूर व इतर पिकांची लागवड केली. दि. 11 जून नंतर मात्र पावसाने पाठ फिरविल्याने लागवड केलेली पिके जळून गेली असून दुबार पेरणीचे संकट शेतक-यांवर कोसळले आहे. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. सन 2015 -16 मधील दुष्काळी अनुदान, कांदा पिकाचे अनुदान व पिकविमा अनुदानातही शासनाकडून उशीर होत असून त्यात कर्जमाफीच्या रोज नव्या घोषणा या मुळे शेतक-यांच्या अडचणींत आणखी वाढ होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.