शिवसेना नगर शहराचा विकास करणारी - माजी आ.अनिल राठोड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरामध्ये गेल्या 30 वर्षांपासून शिवसेना कार्यरत आहे. सामान्य लोकांमध्ये राहून त्यांच्या अडचणी सोडविणारा पक्ष म्हणजेच शिवसेना. त्यामुळे शहरामध्ये शिवसेनेचे एक वेगळे वलय आहे. शिवसेना ही सगळ्यांना विश्‍वास देणारी, संरक्षण करणारी आणि नगर शहराचा विकास करणारी आहे. अनेक तरुण मुले शिवसेनेकडे आकर्षित होतात. शिवसेनेत आलेल्या मंडळींना विश्‍वास आहे शिवसेनेतच आपल्याला न्याय मिळेल,” असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीमधील सुशांत म्हस्के, मुकेश धसाळ, चेतन कराड, अमित गायकवाड, विनीत पाडळे, दीपक गायकवाड, राकेश चक्रनारायण, श्रीकांत वाघचौरे, सचिन बाबनी, विकी प्रभळकर, जावेद सय्यद यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत 150 कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, रावजी नांगरे, रावसाहेब भाकरे, निखिल होगले, मुन्ना भिंगारदिवे, दीपक कावळे, महेश शेळके, सचिन राऊत, प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

राठोड पुढे म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केलेली ही मंडळी आपल्या भागामध्ये अत्यंत चांगली सामाजिक कामे करतात. समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी झटत असतात. कै. बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे 80 टक्‍के समाजकारण 20 टक्‍के राजकारण यावरच शिवसेना उभी आहे. महापालिकेमध्ये महापौर शिवसेनेचा आहे. जे जे काम तुम्हाला अपेक्षित आहे त्या सुविधा, सर्व गोष्टी आपण सोडवू आणि एक वेगळी पहाट आपल्या जीवनामध्ये येईल.

समाजामध्ये यांनी मोठी क्रांती केली, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या सर्वांना मी वंदन करतो. नगर शहरामध्ये राजकारणात सर्वसामान्य लोक शिवसेनेत राहून पदावर बसून कुठल्या कुठे निघून गेले. तीन वर्षांमध्ये लोकांनी जी चूक केली ती आता त्यांच्या लक्षात येत आहे आणि लोक आता शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर परत यायला सुरुवात झाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.