महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटून दोघे ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आडवा-ओढा याठिकाणी एका पादचारी महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटून कारमधील चालक व पादचारी महिलाही जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. बबन शंकर पावसे (रा.हिवरगाव पावसा) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर महिलेचे नाव समजू शकले नाही.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिवरगाव पावसा याठिकाणी असणारे बबन शंकर पावसे हे अकोले तालुक्यातील तांभोळ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी शाळेवर गेले होते. शाळा सुटल्यानंतर ते आपल्या कार क्रमांक एमएच १७ एझेड ४२७८ हिच्यामधून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने हिवरगाव पावसा येथे घरी जात असताना आडवा-ओढा येथे त्यांच्या कारला एक पादचारी महिला आडवी गेली. त्या महिलेला वाचवण्याच्या नादात त्यांच्या कारने पलटी मारली.

त्यामुळे झालेल्या अपघातात पावसे यांच्यासह ती पादचारी महिलाही (नाव माहीत नाही) ठार झाली आहे.अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तात्काळ औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेत असताना पावसे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हिवरगाव पावसा गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.