स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने तरुणाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने दाढ बु येथील तरुणाचा मृत्यू झाल्याने परीसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 



दाढ बु ता राहता येथील नयुम खलील शेख वय 27 वर्षे या तरुणाला स्वाईन फ्लू सदृश्य आजाराची लागण झाल्याने त्याचा वर आश्वी येथे प्राथमिक उपचार करून त्यास संगमनेर व नाशिक येथे उपचारा साठी दाखल केले होते उपचारा दरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने त्यास प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

काल रात्री त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आश्वी बु येथील पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या नयुम शेख हा मनमिळाऊ स्वभाव चा होता त्याचा अकाली मृत्यू ने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांचापश्चात आई वडील भाउ बहीण असा मोठा परिवार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.