शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संगमनेरमध्ये १३ जुलैला शेतकरी मेळावा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आवाज उठवण्यासाठी आणि आंदोलनाच्या नियोजनासाठी 13 जुलैला तालुक्‍यातील विनायक लॉन्स येथे शेतकरी जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेआहे. याबाबतची माहिती किसान क्रांती आणि किसानसभा संघटनेच्या वतीने देण्यात आली.

जगाचा पोशिंदा शेतकरी वर्गाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनातून सरकारने मार्ग काढत कर्जमाफी जाहिर केली. परंतु ही कर्जमाफी तटपुंजी आहे, असे संबंधित संघटनांचे मत आहे.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, शेती मालाला रास्त हमीभाव द्या, शेतकऱ्यांचे सर्व वीजबिल माफ करून त्यांना मोफत वीज पुरवठा करा, गायीच्या दुधाला 50 रूपये तर म्हशीच्या दुधाला 65 रूपये भाव द्या, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या, शेतकऱ्यांना 60 वर्षे वयानंतर 3 हजार रूपये पेंशन द्या, अशा मागण्या जिल्हा मेळव्यात करण्यात येणार आहेत.

शिर्डी संस्थानने 500 कोटी रूपये निळवंडे कालव्यांसाठी जाहीर केले आहेत. परंतु कालव्यांची कामे होत नसल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. निळवंडेच्या पाटपाण्यासाठी अनेक आंदोलने झाली. ज्यांचा सहभाग या निळवंडेच्या निर्मितीसाठी होता, त्यांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. त्यामुळेहा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठीची मागणीही या मेळाव्यात करण्यात येणार आहे.

शेतकरी नेते डॉ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नामदेव गावडे, डॉ. अजित नवले, करण गायकर, गणेश कदम, बाळासाहेब चव्हाण, रोहिदास धुमाळ, संजय पाटील, राजू देसले, संजय जगताप, बाळासाहेब पठारे, संजय भोर, संतोष वाडेकर, डॉ. धनंजय धनवटे, सतीश भांगरेमेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.