संगमनेर मध्ये चुलत चुलत्याने पुतणीला पळविले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारातील ठाकरवाडी येथील इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्याच चुलत चुलत्याने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलगी पानोडी येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असताना ठाकरवाडी येथे राहत होती. नेहमीप्रमाणे ही मुलगी शनिवारी (दि. ८ जुलै) आपल्या मोठ्या भावासमवेत शाळेत गेली होती. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यानंतरही मुलगी घरी न आल्याने वडिलांनी मुलीच्या मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेतला. पण मुलगी आढळून आली नाही. मुलीचे घरातील दोन ड्रेस व मुलीचा चुलत चुलता ही गायब होता.

त्याचा मोबाईल ही बंद असल्याने आपल्या मुलीला त्यानेच फूस लावून पळवून नेल्याची खात्री होताच तिच्या वडिलांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरनं ६७/०७, भा.दं.वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.