संगमनेरच्या अमृतवाहिनीने शितलला घेतले दत्तक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेरच्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेने कायम आपला सामाजिक बांधिलकीचा लौकिक जपला असून विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण केले आहे. संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नागरिक विमा सुरक्षा पॉलिसी काढलेली आहे. 


या पॉलिसीच्या रकमेपोटी दोन लाख रुपयांचा आगाऊ धनादेश शरयूताई देशमुख यांनी शितल हरवणे हिच्या कुटुंबाला दिला. त्याचबरोबर तिला दत्तकही घेतले असून तिच्या पुढील शिक्षणाचाही खर्चही त्या करणार आहेत.

अ.नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील विद्यानगर येथे हरवणे परिवारास अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्­वस्त शरयूताई देशमुख यांनी भेट देवून सांत्वन केले. 

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने काढलेल्या नागरिक विमा सुरक्षा पॉलिसीच्या रक्कमेपोटी दोन लाख रुपयांचा आगाऊ मदतीचा धनादेश शितल हिस दिला. याप्रसंगी डॉ.रेखा लबडे, प्रा.आर.एस.खर्डे, प्रा.ए.ई.कचरे, भास्कर मुंगसे आदि उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia


ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS & Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Powered by Blogger.