सहारा फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम उत्साहात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सहारा फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमात विविध पक्षात निवड झालेल्या नवनिर्वाचित युवक पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. 


तांबटकर गल्ली येथे झालेल्या ईद मिलन कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नगरसेवक हाजी फैय्याज शेख, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद (भा) कुरेशी, आसिफ सुलतान, शाकीर शेख, अहमदनगर सोशल क्लबचे नईम सरदार, मुस्लीम युवा ग्रुपचे इंजि. इम्रान खान, लाला हाजी, मुसद्दीक मेमन, अल्तमाश जरीवाला, शरीफ सय्यद, अज्जु शेख, अन्वर सय्यद, जावेद मास्टर, अशरफ शेख, इम्रान गुरू, इम्रान सय्यद, अन्जर खान, शादाब शेख आदिंसह सर्व पक्षीय युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरसेवक हाजी फैय्याज शेख म्हणाले की, युवक कार्यकर्ते विविध पक्षात असले तरी समाजाप्रती जागृक आहे. समाजाच्या विकासासाठी व अडचणीप्रसंगी धावून येणारे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुजाहिद (भा) कुरेशी यांनी ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासली जावून, जातीय सलोखा अबाधित राहतो. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांची ओळख होते. सहारा फाऊंडेशनने शहरात समाजोपयोगी कार्य उभे केले असून, या ईद मिलनच्या कार्यक्रमाने एक सामाजिक संदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले.

साहेबान जहागीरदार म्हणाले की, सर्वसामान्यांचे काम करता करता अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. वंचितांची सेवा करताना त्यांचा आशिर्वाद मिळत असतो. अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

उपस्थित सर्व पक्षीय युवक पदाधिकार्‍यांचा सत्कार फाऊंडेशनचे मार्गदर्शक हाजी अमीर जुम्मा खान यांनी केले. यावेळी उपस्थितांनी शिरखुरमा पेयाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजीम राजे, उपाध्यक्ष समीऊल्लाह उर्फ समीर खान, लतीफ खान, अंजुम शेख, पठाण, शोऐब शेख आदिंनी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.