श्रीरामपुरात बंदुकीचा धाक दाखवित महिलेवर बलात्कार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आरटीओ कार्यालयाजवळ राहणाऱ्या एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. शनिवारी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अमर पवार (पूर्ण नाव माहित नाही) व सपना अमर पवार (दोघेही रा. सेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी  पीडित महिलेला ७ जुलै २०१७ पासून सेल पिंपळगाव येथे कामासाठी व औषधोपचारासाठी घेऊन जातो, असे दोन्हीही आरोपींनी आमिष दाखविले. त्यानंतर पती घरी नसताना अमर हा स्वत:च्या चारचाकी गाडीत आला. त्याने बंदुकीचा धाक धाकवून, दमदाटी करत बलात्कार केला. तसेच सेल पिंपळगाव येथेही वेळोवेळी अमर पवार याने राहत्या घरी अत्याचार केला.

याप्रकरणी महिलेने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गु.र.नं. १८९ अन्वये ३७६, ३५४, ५०६, ३४ सह आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी सहाय्यक निरीक्षक भोसले हे करीत आहेत. दरम्यान, आरोपी अमर पवार यास पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia

ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS & Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Blogger द्वारा समर्थित.