मदत व पूनर्वसन विभागामार्फत राहुरीसाठी मोठा निधी - आ.कर्डिले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत राहुरी तालुक्यातील विविध गावातील विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याची माहिती आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन खात्याची बैठक दि २७ जून रोजी राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महसुल व पुनर्वसन खात्याचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, आ.शिवाजीराव कर्डिले, आ.मोनिकाताई राजळे, आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे घेण्यात आली होती.

बैठकीत जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पुनर्वसित गावांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत खास निधी उपलब्ध करुन दिला जातो, हा निधी तात्काळ खर्च करावा या करिता अहमदनगर जिल्ह्याची स्वतंत्र बैठक माजी मंत्री आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत तत्काळ घेण्याचे आदेश महसुल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी महसुल, मदत व पुनर्वसन विभागाच्या नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांना दिले होते. त्या आदेशान्वये दि.२९ जून २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अ.नगर येथे सदर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आ.शिवाजीराव कर्डिले यांच्यासह आ.मोनिकाताई राजळे, उपजिल्हाधिकारी पालवे, महसुल तसेच मदत पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राहुरी तालुक्यातील मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पुनर्वसित गावांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात येत असलेला खास निधी तत्काळ खर्च करावा या करिता संबंधीत गावातील महत्वाच्या विकासकामांचे अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याच्या सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त, नाशिक यांनी दिल्या. त्याप्रमाणे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर ते राहुरी रस्ता, बा.नांदूर ते बोरटेक वस्ती रस्ता, बारागाव नांदूर ते कुरणवाडी रस्ता, जांभळी ते बारागाव नांदूर रस्ता, जांभळी ते वावरथ रस्ता, देसवंडी ते राहुरी रस्ता, स्मशानभूमी, ग्रा.पं. कार्यालय इमारत, दफनभूमी आदी सुचविलेल्या विकास कामांना मदत व पुनर्वसन विभागा मार्फत निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आ.कर्डिले यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.