वाळूच्या ढिगाऱ्याखाली दोन भावांचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्‍यातील डिग्रस येथे मुळा नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.ज्ञानदेव जालिंदर जाधव (वय 35), मच्छिंद्र जालिंदर जाधव (वय 29, दोघे रा. बारागाव नांदूर, बावनखोल्या परिसर, ता. राहुरी) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर असे की, राहुरी तालुक्‍यातील डिग्रस केटीवेअर येथे मुळा नदीपात्रातून वाळूउपसा सुरू आहे. सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान काही मजूर नदीपात्रात वाळू भरत होते. त्यामध्ये बारागाव नांदूर येथील बावनखोल्या परिसरात राहणारे ज्ञानदेव जालिंदर जाधव व मच्छिंद्र जालिंदर जाधव दोघे सख्खे भाऊ कपारीतून वाळू काढत होते.

त्याचवेळी वाळूचा मोठा ढिगारा कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली दोघे दबले गेले. तेथील इतर मजुरांनी जाधव बंधूंना ढिगाऱ्याखालून काढून राहुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे यांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी आणखीही काही मजूर ढिगाऱ्याखाली दबले होते. परंतु, इतर मजुरांनी त्यांना त्वरित बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचल्याची परिसरात चर्चा सुरू होती.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.