शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी शाळेला टाळे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी शहर परिसरातील येवले वस्तीच्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक शहरातील येवलेवस्ती येथील नगरपरिषद अंतर्गत असलेल्या शाळेतील शिक्षकाची बदली केल्याने पालकांनी शाळेलाच टाळे ठोकल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

राहुरी शहरातील येवलेवस्ती येथे नगरपरिषद अंतर्गत नूतन मराठी शाळा क्रमांक नऊ ही शिक्षण मंडळाची आयएसओ मानांकित शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. 130 विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे शिक्षण घेत आहेत. या शाळेत गेल्या दोन वर्षांपासून तुकाराम भांड हे शिक्षक कार्यरत होते.

तुकाराम भांड यांनी दोन वर्षांत उल्लेखनीय काम करून या शाळेचा शिक्षणाचा दर्जा वाढविला आहे. त्यांच्या कामामुळे ते सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आवडते शिक्षक बनले. मात्र, तालुक्‍यातील काही लोकांनी राजकारण करण्यासाठी तुकाराम भांड यांची विनाकारण तडकाफडकी बदली केली. 

त्यांची बदली झाल्याची खबर येवले वस्तीवर पसरताच पालकांनी शुक्रवारी आपल्या मुलांना वर्गातून बाहेर काढले व शाळेच्या गेटला टाळे लावले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इतर शिक्षकांनी एका झाडाखाली शाळा भरवून शिकविण्याचे काम सुरू ठेवले आहे. जोपर्यंत भांड सरांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा पवित्रा पालकांनी घेतला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.