आठ वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आठ वर्षाच्या मुलीवर १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची खळबळजनक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनेगाव (ता. कोपरगाव) येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. .

पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार या बाबतचे वृत्त असे की, दि.१० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास १५ वर्षाच्या या आरोपी मुलाने पिडीत मुलीस बळजबरीने घरात नेऊन एका हाताने तिचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग केला आहे.

पिडीत लहान मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी घडल्या प्रकाराची राहाता पोलिसात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपीस बालन्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 

आरोपी विरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ३ (क) व ४,५ (ढ) व ६ प्रमाणे गु.र.नं. ६८ ला गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल वाठोरे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.