काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखेंचे भाजपात जाण्याचे संकेत.

महाराष्ट्र टाईम्स अहमदनगर :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी भाजपात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिर्डीतील कार्यक्रमात विखे यांनी फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळतानाच, ‘गेल्या सरकारमधील मंत्र्यांपेक्षा आताचे लोक मला जवळचे वाटतात,’ अशी जाहीर भूमिका मांडली.ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

शिर्डी नगरपालिकेच्या ३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता बबनराव लोणीकर हे तीन मंत्री, शिर्डी संस्थांनचे अध्यक्ष सुरेश हावरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे, डॉ. सुजय विखे यांच्यासह शिर्डीतील विखे समर्थक मोठ्या संखेने उपस्थित होते.

‘होय, माझी व मुख्यमंत्र्यांची मैत्री आहेच आणि आज मी त्यावर जाहीर शिक्कामोर्तब करतोय. मागच्या काळातल्या मंत्र्यांपेक्षा आताचे लोक(भाजपचे) मला जवळचे वाटतात. मी घरी आलो आहे,’ असे सांगत विखे यांनी भाजपात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले.यावेळी विखे यांनी काँग्रेस व राष्ट्र्वादी काँग्रेसच्या अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

विखे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीची कबुली देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमच्या पक्षात मित्र अधिक आणि स्व-पक्षात शत्रूच अधिक आहेत. आम्ही दोघे मिळून विकास कामे करतो. त्यात राजकारण आणत नाही. विरोधी पक्षनेते माझ्याकडे कधीच चुकीचे काम घेऊन येत नाहीत. आम्ही दोघे विकासावर उत्तम काम करतो. भविष्यात काहीही घडू शकते,’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विखे यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले.

पालकमंत्री राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे दोघे विकास कामात एकत्र आल्याच्या घटनेवर सूचक भाष्य केले. त्यावर हशा पिकला. राम शिंदे म्हणाले, ‘आजचे हे चित्र माझ्या राजकीय वाटचालीत प्रथमच अनुभवतो आहे. हा दुग्धशर्करा योग आणखी दृढ व्हावा अशी लोकांची इच्छा आहे.’ मुख्यमंत्र्यांनीही त्यावर, ‘राम शिंदे यांच्या विधानाची मी नक्की नोंद घेतली आहे,’ असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.