पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावच्या साधना वाचनालयास हवे पुस्तकांचे दान.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्नेहालय -अनामप्रेम परिवारातील साधना ग्रामीण वाचनालय पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावात ज्ञानदानाचे काम करीत आहे. या साधना वाचनालय परिसरातील मधील बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे, नगर , औरंगाबाद ईत्यादी शहरामध्ये जात आहे. आज या परीक्षेला बसणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. यांपैकी बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.तरी देखील आई-वडील काबाडकष्ट करुन, वेळ प्रसंगी शेत विकून, कर्जाने पैसे काढून आपल्या मुला-मुलींना देत आहे.की आज ना उद्या हा अधिकारी होईल..आज नगर, पुण्यासारख्या ठिकाणी एक विद्यार्थ्याचा मासिक खर्च रुपये ६०००ते ८०००/- आहे. हा भरमसाट खर्च ग्रामीण भागातील पालकांना परवडत नाही.
न आज महाराष्ट्रामधील बरेच तरुण व तरुणी असे आहेत,ज्यांना या वरील परीक्षा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे.पण घरच्या गरिबी मुळे हे तरुण- तरुणी परीक्षा देऊ शकत नाही.मुलींना तर घरच्या गरीबीमुळे आणि लग्न लवकर लावून देणे, यामुळे मुली आपले स्वप्नं देखील पुर्ण करु शकत नाही. आपल्याकडे मुलींना शहरांसारख्या ठिकाणी एकटीला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पाठवण्याचा टक्का तर खूपच कमी आहे,यामुळे बऱ्याच मुलींची आपली अधिकारी किंवा विविध क्षेत्रामध्ये जाण्याची स्वप्ने पूर्ण झालेले नाहीत.त्यामुळे आज बऱ्याच मुली स्वतःच्या पायावर उभ्या नाही राहू शकल्या. अशा परीस्थितीत या होतकरू विद्यार्थ्यांसाठी साधना वाचनालय गेल्या २ वर्षापासून काम करीत आहे.

ज्या सोयी सुविधा शहरामध्ये भेटतात त्या धर्तीवरती आपण ही अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरु करत आहोत. आम्ही या अभ्यासिके मध्ये व ग्रंथालयामध्ये चांगल्या दर्जाची बैठक व्यवस्था,सर्व स्पर्धा परीक्षेची पुस्तके,मासिके आणि वृत्तपत्र वाचायला उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वाय-फाय सुविधा,तसेच कॉम्प्युटर आणि LCD projecter याची देखील व्यवस्था या अभ्यासिकेमध्ये आहे. या माध्यमातून विविध विषयांचे व्हिडीओ लेक्चर ,आणि पीडीएफ पुस्तके उपलब्ध करुन दिली जातील.

अभ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या तर या विद्यार्थ्यांना शहरामध्ये जावे लागणार नाही. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. या अभ्यासिकेमध्ये हे विद्यार्थी अभ्यास करून आपले यश नक्कीच संपादित करतील . आम्ही हे सर्व करण्यामागचा एकच हेतू आहे की,आज ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे,पुस्तके घेऊ शकत नाही, शहरामध्ये येऊन अभ्यास करण्यासाठी पैसे नाहीत,मार्गदर्शन नाही, अशा कारणास्तव आपली स्वप्ने पूर्ण करून शकले नाहीत.या सर्वांसाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.

आपण आपल्या कडील असणारी सुस्थितील वाचनीय पुस्तके मासिके, स्पर्धा परिक्षा साहित्य, तसेच फर्निचर(खुर्ची, टेबल, मांडणी, कपाट,ई.)देऊन सहकार्य करावे. देणगी-दात्यानी सचिन खेडकर (९६५७५४९३९२) या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.