दौंड यांच्यावरील हद्दपारीची कारवाई रद्द.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांची पाथर्डी तालुक्यातून एक वर्षासाठीची हद्दपारीची कारवाई रद्द करण्याचे आदेश नाशिक विभागाचे महसूल विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहेत.

पाथर्डीतील गोकुळ दौंड यांना उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी यांनी एक वर्षासाठी तालुक्यातून हद्दपार करण्याचा आदेश १५ मे २०१७ रोजी दिला होता. दौंड यांनी उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांच्या निर्णयाच्या विरोधात नाशिक विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केले होते.

याची सुनावणी होवुन दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेवून महेश झगडे यांनी ४ जुलै २०१७ रोजी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १०५१ कलम ५६ (१) (अ) (ब)नुसार उपविभागीय अधिकाऱ्यांचा हद्दपारीचा निर्णय रद्द करुन तो पुन्हा फेरचौकशीसाठी पाठविण्यात आला आहे.

गोकुळ दौंड यांची पत्नी रंजना दौंड या पंचायत समितीच्या सदस्या आहेत. राजकीय पार्श्वभूमी असल्याने दौंड यांच्या हद्दपारीतेचा निर्णय रद्द झाल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरडगाव पंचायत समिती गणातून सुनीता दौंड या भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या आहेत. 

जनतेच्या कामात आपण नेहमी पुढे राहीलो आहोत. व्यक्तिगत व्देषातून माझ्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. पक्षाचे व सामाजिक काम करताना कळत-नकळत अनेकांची मने सांभाळावी लागतात. काही वेळा एखाद्या माणसाचे मन दुखु शकते. मात्र तो खूप मोठा गुन्हा नसतो, मी समाजाच्या कमात राहीलो आहे व राहीन असे गोकुळ दौंड यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.