पाथर्डीत गुप्तधनाचा शोध, चार जणांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जांभळी गावातील पीरबाबा पहाडीला खड्डा खोदून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, दोन मोटारी जप्त केल्या आहेत. रविवारच्या पौर्णिमेला रात्री दहा वाजता हा प्रकार घडला. 

जांभळी गावातील पीरबाबा पहाडावर गुप्तधन असल्याची माहिती एकनाथ आव्हाड (मूळ रा.जांभळी, हल्ली रा. केडगाव, नगर) यांना होती. ते गुप्तधन शोधण्यासाठीचे यंत्र असणाऱ्या काही जाणकार व मांत्रिकासह दोन मोटारीसह जांभळी येथे पौर्णिमेला रविवारच्या रात्री पोहचले. 

यंत्राच्या सहायाने पहाडावर गुप्तधनाचा शोध घेण्यात आला. काही संकेत मिळताच खड्डे खोदण्यात आले. अंधार असल्याने बॅटरीचा वापर करण्यात आला होता. बॅटरीच्या प्रकाशामुळे परिसरातील ग्रामस्थ चोर आले म्हणून घाबरले. ग्रामस्थांनी एकत्रित येत पीरबाबाच्या पहाडाकडे गेले. तेव्हा त्यांना तिथे सहा जण खड्डा खोदताना दिसले. ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला.

एकनाथ आव्हाड (रा.जांभळी), सचिन मनोहर पोतदार (रा.भूषणनगर केडगाव), दादासाहेब मारुती देवकर (रा.चास, ता.नगर) व गणेश शहाजी नवले (रा.पिंपळे गुरव, नवीसांगवी, पुणे) या चौघांना पकडण्यात यश आले. राजा भोज (रा. पुणे, पूर्ण नाव माहीत नाही) व गायकवाड (रा. वैजापूर, जि.औरंगाबाद) हे दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. 

पोलिसांनी दोन मोटारी जप्त केल्या आहेत. या गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. खड्डयात अघोरी पूजा करून गुप्तधन मिळविता येते, अशी हकिगत या पकडलेल्यांनी सांगितली. पोलिसांनी वरील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी अधिनियम इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम तीन प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Social Media Marketing,Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia

ADVT - Website Designing,Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Blogger द्वारा समर्थित.