क्रीडा तासिका पूर्ववत होण्यासाठी शिक्षकांचा एल्गार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाबरोबर शारीरिक विकास होण्यासाठी विद्यार्थी मैदानावर टिकणे आवश्यक आहे. असे असताना शासनाने कुठल्याही तज्ञ समितीची शिफारस नसताना कला, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होऊन विद्यार्थी हतबल होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांत अभिरुची निर्माण करणार्‍या व शारीरिक तंदुरुस्ती टिकविणार्‍या विषयाच्या तासिका पूर्ववत व्हाव्यात म्हणून निवेदने, आंदोलने करूनही शासन कुठलीच दखल घेत नसल्याने शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धेवर व पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट फुटबॉल वन मिलीयन कार्यक्रमावर बहीष्कार घालण्याचा निर्णय न्यू इंग्लीश स्कूल पारनेर येथे झालेल्या बहीष्कार सभेत एकमुखी घेण्यात आला. बहिष्काराचे निवेदन नगर पारनेर तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांना देण्यात आले.

28 एप्रिलच्या परीपत्रकाने कला-क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्या असून आर.टी.ई. नुसार आठवी पर्यंन्त कला, क्रीडा विषयास शिक्षक न ठेवल्याने भविष्यात मुले मैदानावर खेळण्या ऐवजी टीव्ही, मोबाईलच्या आहारी जाऊन पुढील अनेक पिढ्या बरबाद होणार असल्याने पालकांनी या लढ्यात उतरावे असे आवाहन क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले.उ़दय जोशी यांना निवेदन देऊन मिटींगवर पूर्ण बहीष्कार घालण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र हिंगे, दत्तात्रय औटी, बापू होळकर, राजेंद्र कोतकर, दादासाहेब दुसुंगे, विजय जाधव, प्रताप बांडे, शिरीष टेकाडे, उन्मेश शिंदे, दत्तात्रय नारळे, संजय कुसकर, भाऊ धावडे, महादेव साबळे, विनायक उंडे, बाबासाहेब म्हस्के, गाजरे, बापू जगताप, नाना डोंगरे, ढमढेरे, मंगेश ठोंबळ आदिंसह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.