पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपींना मोक्का.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील पांगरमल येथे बनावट दारू प्राशन केल्याने अनेकांचे बळी गेले होते. या घटनेत पोलिसांनी १९ जणांना अटक करून त्यांच्यावर खटला दाखल केला आहे.या घटनेचा तपास सीआयडी करत आहे. शुकवार दि.१४ रोजी सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी या सर्वांना मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे.


एकाच वेळी एवढ्या आरोपींना मोक्का लावण्याची सीआडीच्या इतिहासातील बहूधा ही पहिलीच वेळ असावी.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील पांगरमल येथील एका उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्याने अनेकांचा बळी गेला होता. 

तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.