राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य सरकारने शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची भेट दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री घेण्यात आला.

शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे राज्य सरकारच्या माथ्या वरील कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी १२ ते १४ जुलैचा संप मागे घेण्याची घोषणा केली.

सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांची यादी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला सादर केली होती. मात्र, या मागण्यांची अंमलबजावणी करण्यास सरकार टाळाटाळ करत होते. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या धर्तीवर आपल्याही मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने राज्य सरकारवर दबाव आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली होती.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.