रविवारी "कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे' चा प्रकाशन समारंभ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सकाळ'चे निवासी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील लिखित "कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवारी (ता. 9) दुपारी साडेतीनला येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजी कर्डिले, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष दादा कळमकर, शिवसेना नेते प्रा. शशिकांत गाडे, महाराष्ट्र राज्य स्वयंसेवी संस्था महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष विनायक देशमुख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, आमदार राहुल जगताप, आमदार संग्राम जगताप, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रशांत गडाख, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

नगर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक, राजकीय, सहकार, सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, बॅंकिंग अशा विविध क्षेत्राचा मोठा वारसा आहे. या क्षेत्रांमधील दिग्गजांचे व्यक्तिचित्रण करणारी मालिका डॉ. बोठे पाटील यांनी "सकाळ'मधून लिहिली आहे. त्या मालिकेतील लेखांचा संग्रह आता "कारभारी'च्या माध्यमातून पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहे. प्रकाशन समारंभासाठी प्रवेश खुला असून, त्यामध्ये विविध क्षेत्रांतील मंडळी सहभागी होणार आहेत.

"वारसदार' व "कारभारणी'ही लवकरच 
विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या कारभारी मंडळींच्या प्रभावी वारसदारांची मालिका सकाळमधून नुकतीच प्रकाशित झाली. याशिवाय विविध क्षेत्रांत कर्तुत्व गाजविलेल्या महिलांनी कारभारणी ही मालिकाही चांगलीच गाजली. या दोन्ही मालिकांमधील लेख लवकरच सकाळ प्रकाशनाच्या पुढाकाराने वारसदार व कारभारणी या पुस्तकांच्या रुपाने उपलब्ध होणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.