महाविद्यालयाचा आंधळा कारभार; विद्यार्थ्यांची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यात प्रामुख्याने महाविद्यालयातील वर्ग भरत नाही. वर्गातील तास, प्रात्यक्षिके होत नाहीत. विद्यार्थ्यांची फसवणूक करून विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या जातात. सर्व आंधळा कारभार चालू आहे. याबाबत कुलगुरू यांनी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

महाविद्यालयाचा नाकर्तेपणा वाढत चालला आहे. यामध्ये मुलांना प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. प्रथम वर्षाला एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही कारणास्तव त्या महाविद्यालयातून प्रवेश कमी करून जर मुलांना दाखला किंवा टी. सी. हवा असेल तर महाविद्यालयाकडून “संपूर्ण 3 वर्षांची फी भरा आणि दाखला घेऊन जा,’ असे उर्मट उत्तर दिले जाते व त्या विद्यार्थ्यांची तीन वर्षांची फी भरून फसवणूक करतात.

यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यालयाचा मोठा विषय समोर आला आहे. या कोर्सच्या विद्यार्थ्यांची खूप मोठी फसवणूक होत आहे. या कोर्सला प्रवेश घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यांनी या प्रवेशासाठी 1 लाख 60 हजार कुठून आणायचे, शिक्षण फक्‍त श्रीमंतांनीच घ्यायचे का ? 

त्यात सवलतीच्या स्कॉलरशिपच्या प्रवेशासंदर्भातसुध्दा हीच अडचण आहे. विद्यार्थी कोणत्याही वर्गाला प्रवेश घेण्यासाठी अथवा दाखला काढण्यासाठी कोणत्याही महाविद्यालयाने अडवणूक करू नये याबाबत कुलगुरुंनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.