विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाच्या जोरावर पुढील कारकिर्द यशस्वी करावी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :इ. 10 चे वर्ष हे शैक्षणिक क्षेत्रातील पहिला महत्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर मिळविलेल्या यशाच्या जोरावर पुढील शैक्षणिक कारकिर्द यशस्वी करुन आणखी यश संपादन करुन आई-वडिलांबरोबरच आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनी दिलेल्या गुरुमंत्राचा पुढील जीवनात उपयोग करावा. या पुढील विश्‍व हे व्यापक असे असणार आहे, यात वावरतांना आपल्या शाळेने दिलेली शिकवण व संस्कार उपयोगी पडणारे आहे, असे प्रतिपादन श्री सावताश्रम शिक्षण संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बोराटे यांनी केले. 

श्री संत सावताश्रम शिक्षण समितीच्या सावित्रीबाई फुले माध्य.विद्यालयातील इ.10 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चेअरमन तथा मनपा विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका सुनिता पालवे, ऋषीकेश आगरकर, हर्षल म्हस्के, परेश लोखंडे, राजीव घोलप, आनंदा खराडे, संगीता बडे, एस.के.घोसाळे आदि उपस्थित होते.

यावेळी इ.10वीत अक्षता सुरेश खामकर, कशप फारुक पिंजारी, भाग्यश्री गोरख सोनवणे आदि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका सुनिता पालवे यांनी शाळेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन संगीता बडे यांनी केले तर आभार राजू घोलप यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.