विविध निधीच्या माध्यमातून प्रभागाची आदर्शतेकडे वाटचाल- फुलसौंदर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रभागातील विकासासाठी आपण महापौर असतांना विविध योजना राबविल्या असल्याने या भागाचा मोठा विकास झाला आहे. आताही प्रभागातील प्रत्येक भागातील मुलभूत समस्या सोडविल्या आहेत. ज्या भागात अत्यवश्यक सुविधांची आवशकता असते; तेथे आपण स्वत: लक्ष घालून सोडवत आहे. गेल्या वर्षीच शिवसेनेची मनपात सत्ता आल्याने विविध निधीच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्‍न सोडविण्यात येत आहेत. 


ADVT - Smart Watch Phone With Camera, TF Card and Sim Card Support with all Smartphones. खरेदी करण्यासाठी इथे पुढील लिंकवर क्लिक करा http://amzn.to/2soYsTd

प्रभागाच्या विकासासाठी आणखी काही प्रस्ताव मनपात दाखल केले असल्याने पुढील काळात आपला प्रभाग एक आदर्शवत प्रभाग होणार आहे. तसेच महापौर असतांना समर्थनगर मधील पाण्याच्या टाकीचे काम केले; आता लवकरच या टाकीत पाणी येवून प्रभागातील नागरिकांनी मुबलक पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

प्रभाग 30 मधील जिजामाता कॉलनी परिसारातील रस्त्याच्या सिमेंट कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास शरद शिंदे, संजय पंडित, रविंद्र काळभोर, सागर काळभोर, विनोद काळभोर, अनिल जोशी, कौसाबाई गायकवाड, बाळू शिंदे, राजू शिदोरे, रिंकू शिदोरे, दिनकर जोशी, बाळू सुपेकर, संतोष सिनारे, विकास शिंदे, दिपक काळभोर, दिपक शिंदे, बाबासाहेब काळभोर, सय्यद अहमद, अशोक काळभोर, कविता काळभोर, रेखा शिंदे, प्रिती काळभोर, जयश्री सुपेकर, सुरेखा काळभोर, मीना खैरे, सुनिता काळभोर, पप्पू खैरे, संगीता गायकवाड, सोनाली भुजंग आदि उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.