पांगरमल विषारी दारु प्रकरणातील चौघांना जामीन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बहुचर्चित पांगरमल विषारी दारुप्रकरणातील चार आरोपींना 25 हजाराच्या व्यक्तिगत जातमुचलक्‍यावर जामीन देण्यात आला. जि. प. व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या पांगरमल दारुप्रकरणात 9  जण मयत झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. मात्र, या प्रकरणात मंगल आव्हाड, महादेव आव्हाड, वैभव उर्फ शेखर जाधव, गोविंद मोकाटे या चार आरोपींना न्या. व्ही. जे. मोहिते यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.

ADVT - Smart Watch Phone With Camera, TF Card and Sim Card Support with all Smartphones. खरेदी करण्यासाठी इथे पुढील लिंकवर क्लिक करा http://amzn.to/2soYsTd

पांगरमल दारुप्रकरणात 9 जणांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. त्यातच या प्रकरणातील राजू बुगे याचा अपघाती मृत्यू झाला असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत.

सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी वरील चार आरोपींचा दारू बनविण्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे, तसेच त्यांचा दारू विकण्यातही सहभाग नसल्याचे निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने या चारही जणांचा जामीन मंजूर केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.