शेतकरी कर्जमाफीच्या अटी जाचक - जयंत ससाणे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जाचक अटी रद्द करून कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी जिल्हा बॅंकेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, याची माहिती बॅंकेचे संचालक जयंत ससाणे यांनी दिली. जिल्हा सहकारी बॅंकेच्या येथील तालुका विकास अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा-प्रवरा वीज संस्थेचे उपाध्यक्ष जी. के. पाटील होते. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर, बाजार समिती सभापती नानासाहेब पवार, अण्णासाहेब थोरात, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, बाळासाहेब तनपुरे यावेळी उपस्थित होते.

ADVT - Smart Watch Phone With Camera, TF Card and Sim Card Support with all Smartphones. खरेदी करण्यासाठी इथे पुढील लिंकवर क्लिक करा http://amzn.to/2soYsTd

ससाणे म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वारंवार परिपत्रकांद्वारे निकष बदलल्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सुधारित परिपत्रकानुसार 1 एप्रिल 2012 नंतर उचलले गेलेले आणि 30 जून 2016 ला थकीत झालेल्या कर्जदार सभासदांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखांपेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्‍यातील अत्यल्प शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल. बहुतांशी शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.

जिल्हा सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि सेवा संस्थेच्या सचिवांनी या कर्जमाफीच्या कामकाजासंदर्भात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जी. के. पाटील, तनपुरे, अशोक बडधे, मुरलीधर राऊत, सुदाम पटारे, रघुनाथ उघडे, कृष्णा शिंदे यांचे यावेळी भाषण झाले. प्रास्ताविक अशोक साळवे यांनी केले. आभार नानासाहेब रेवाळे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.