रुग्णांची गरज ओळखून मधुमेह तपासणी आपल्या दारी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अ.नगर जिल्हा कुष्ठरोग निवारण समिती येथील आरोग्य आधार डायग्नॅास्टीक सेंटर तर्फे विविध आरोग्य चाचण्या अत्यंत अल्प दरात व गुणवत्ता राखून देण्यात येतात. शोध निरोगी जीवनाचा या हेतूने आरोग्य आधारचे कार्य सातत्याने सुरु आहे.
                           
ADVT - Smart Watch Phone With Camera, TF Card and Sim Card Support with all Smartphones. खरेदी करण्यासाठी इथे पुढील लिंकवर क्लिक करा http://amzn.to/2soYsTd

मधुमेही रुग्णांना महिन्यातून एकदा शुगर चेक करणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांना उपाशी पोटी, जेवणानंतर शुगर चेक करण्यासाठी यावे लागते तसेच रिपोर्ट साठी पुन्हा एकदा सायंकाळी यावे लागते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवसच वाया जातो. खरे तर अनेक रुग्ण यामुळे वेळेवर चाचणी करण्याचे टाळतात. तर काही वयस्कर रुग्णांना सोबत कोणी नसल्यामुळे येता येत नाही.

मधुमेही रुग्णांची गरज ओळखून आरोग्य आधारने आता मधुमेह तपासण्या (चाचण्या) रुग्णांच्या दारी अर्थात त्यांच्या राहत्या परिसरात करण्याचा वेगळा प्रयोग सुरु केला आहे. शहरातील विशिष्ठ भागात, परिसरात, कॉलनीत २५ मधुमेही रुग्णांचा ग्रुप करून त्यांच्या शुगर चाचण्यासाठी त्या परिसरात टेक्निशियन व फिरते सेंटर उपलब्ध केले आहे. जेणे करून सहज चालत शतपावली करत रुग्ण त्याठिकाणी येऊन रक्त व लघवी तपासणीसाठी देऊ शकतात व त्याच ठिकाणी त्यांना संध्याकाळी रिपोर्ट देण्यात येतात.

आरोग्य आधार तर्फे हा अभिनव उपक्रम नवजीवन कॉलनी, पूनममोती नगर, भवानी नगर, विनायक नगर, भोसले आखाडा, सारस नगर , जुना कापडबाजार,इमारत कॉलनी येथे सुरु झाला असून मधुमेही रुग्णांचा व नागरिकांचा त्यास उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

वार्षिक अत्यंत अल्प अशा एक हजार रुपयात ही सेवा उपलब्ध असून चेक जिल्हा कुष्ठरोग निवारण समितीच्या नावाने द्यायचा आहे. या अभिनव सेवेमुळे मधुमेही रुग्णांचा वेळ व पैसा यांची बचत तर होणारच आहे पण वेळीच चाचण्या झाल्याने आरोग्यही उत्तम राखता येईल.

आरोग्य आधारच्या या मधुमेह चाचणी आपल्या दारी उपक्रमातून हजारो मनुष्यबळ तासांची बचत व लाखो रुपयांची बचत होणार आहे. साधारणपणे वर्षभरात २५०० मधुमेह रुग्णांचा सहभाग या उपक्रमात होईल अशी अपेक्षा असून २५०० मधुमेहींची वेळ व आर्थिक बचतीचा विचार करता समाजालाही त्याचा लाभ होणार असल्याचे मत श्री.शरद मुनोत यांनी व्यक्त केले. तसेच वर्षभरात नियमित शुगर तपासणी करणाऱ्यांना वर्षाच्या शेवटच्या शुगर चाचणीच्या वेळेस एचबीएवनसी ही २५० रुपयांची तपासणीही मोफत करण्यात येणार आहे.

आरोग्य आधारची टीम यासाठी शहरातील विविध परिसरात, उपनगरात जाऊन मधुमेही रुग्णांची माहिती गोळा करून त्या त्या परिसरात सेवा देण्याचा उपक्रम सुरु करण्यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती अथवा आपल्या परिसरात मधुमेह चाचणी आपल्या दारी उपक्रम सुरु करावयाचा असल्यास कुष्ठधाम रोड सावेडी आरोग्य आधार येथे (०२४१ २३५९७०० किंवा शरद मुनोत ९४२२२२६७७४ ) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.