विनापरवाना बांधकामाच्या चौकशीसाठी आरपीआयचे धरणे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील मौजे बाराबाभळी, केकती, शहापुर व वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत विनापरवाना झालेल्या अनाधिकृत बांधकाम चौकशीच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात योग्य कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. सदर अनाधिकृत बांधकामाची चौकशी न झाल्यास 18 जुलै रोजी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


ADVT - Smart Watch Phone With Camera, TF Card and Sim Card Support with all Smartphones. खरेदी करण्यासाठी इथे पुढील लिंकवर क्लिक करा http://amzn.to/2soYsTd

वरील ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय, उपविभागीय अधिकारी भाग नगर व महसुल विभागाची कुठलीही परवानगी न घेता, जमीन एन.ए. नसताना व कुठल्याही प्लॅनची मंजुरी न घेता बिल्डरांनी आर्थिक हितासाठी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम केले आहे. 

या बांधकामाबाबत ग्रामपंचायत कार्यालयात कुठल्याही प्रकारची नोंद नाही. ग्रामपंचायतीकडे याबाबत माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासन व बिल्डर यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने अनाधिकृत बांधकामाद्वारे ग्रामपंचायतचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडविण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. 

वरील सर्व ग्रामपंचायतीच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई होण्यासाठी चौकशी अधिकारी नेमून चौकशी व्हावी. या प्रकरण दोषी आढळणार्‍या ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिकारी यांचे पद्द रद्दबातल ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहर युवक उपजिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, भिंगार शहराध्यक्ष अमित काळे, सुनिल काळे, माजी नगरसेवक अजय साळवे, सागर भिंगारदिवे, सुमेध गायकवाड, महादेव भिंगारदिवे, धनराज जाधव, महेश भिंगारदिवे, मंगेश मोकळ, करण काळे, संदिप वाघचौरे, वसंत भिंगारदिवे, विशाल बेलपवार, संतोष धिवर, गौतम कांबळे, रवी भिंगारदिवे आदि सहभागी झाले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------

Powered by Blogger.