'युवानच्या' विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर येथील युवान संस्थेच्या मदतीने उच्च शिक्षण घेत असलेल्या ३२ विद्यार्थ्यांनीं मागील शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय यश मिळवले आहे. संस्थेचा निकाल १००% लागला आहे. यातील आकाश जाधव यास शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे प्रथम वर्षात प्रवेश मिळाला.

असे करणारा त्याच्या वंचित समाजातील तो पहिलाच विद्यार्थी आहे. इतरही विद्यार्थी कला, वाणिज्य, शास्र, तंत्रनिकेतन, औद्योगिक, अभियांत्रिकी इ. विविध विद्या शाखांत प्रथम अथवा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अनाथाश्रमध्ये वाढत अथवा पाल तांड्यावर राहून प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत प्रतिकूल परिस्थितीतवर मात करत युवानचे विद्यार्थी येथपर्यंत आले आहेत. अनेक विद्यार्थी त्यांच्या कुटुंबात, समाजात प्रथमच उच्च शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्यांचे यश उल्लेखनीय आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आशाताई फिरोदिया, आय. जी. कृष्णप्रकाश, डॉ. विकास आमटे, आय. ए. एस. अथर अमीर खान, राहुल कर्डीले, उत्पादनशुल्क अधीक्षक अतुल कानडे, सी.ए.किरण भंडारी, अशोक पितळे, डॉ. सुजाता नरवडे, डॉ. नीलम बागल, हेमंत लोहगावकर, नंदा यादव आदींनी अभिनंदन केले आहे. 
Photo - अहमदनगर येथील युवान या सामजिक संस्थेतील विध्यार्थी 
                                         
यंदा १० अधिक अत्यंत गरजू विद्यार्थ्यांचे संपूर्ण पालकत्व स्वीकारण्याचा 'टीम युवान'चा संकल्प आहे. त्यासाठी व संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी, साहित्य, भोजन इ.साठी सहयोगाची गरज आहे. संस्थेच्या वसतीगृह व युवा केंद्रासाठी देणगीदाखल अथवा नाममात्र दरात नगर शहर परिसरात जागेचीही संस्थेला आवश्यकता आहे.

लहानश्या सहयोगातही वंचितांच्या जीवनात बदल घडविण्याचे मोठे सामर्थ्य असल्याने दानदात्यांनी सढळ हातांनी युवानला मदत करावी, असे आवाहन संस्थापक संदीप कुसळकर यांनी केले आहे. संपर्क: ९०११११८७८७ / ९८९०४८६५१०

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.