टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरूच.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना (प्रांत) टंचाईची परिस्थिती असल्यास टंचाई घोषित करून त्यासंदर्भातील उपाययोजना करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी शुक्रवारी (दि. 30) दिले. त्यामुळे आता जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. सध्या जिल्ह्यात 68 गावे 347 वाड्यांतील एक लाख 45 हजार 777 लोकसंख्येसाठी 87 टॅंकर पुरविले जात आहेत. 

यातील 19 शासकीय, तर 68 खासगी टॅंकर आहेत. संगमनेर तालुक्‍यात 17, अकोले 6, कोपरगाव 1, नेवासे 1, पारनेर 25, पाथर्डी 19, शेवगाव 7, जामखेड तालुक्‍यात 1 तर पारनेर नगरपंचायतमध्ये 10 टॅंकर सुरू आहेत. श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर, कर्जत व श्रीगोंदे या तालुक्‍यात टॅंकर सध्या सुरू नाहीत.
जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे टंचाईची परिस्थिती कायम आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नगर जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीतील उपाययोजना संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी अभय महाजन यांना शुक्रवारी पाठविले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.