संजीव भोर यांसह १२ कार्यकर्त्यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा समाजास सरसकट कुणबी संबोधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी ऑगस्ट 2008 मध्ये नगर जिल्ह्यात प्रचंड उद्रेक झाला होता.आरक्षणाच्या मागणीसाठी संजीव भोर,आदिनाथ काळे यांच्या पुढाकाराने नेवासा तालुक्यातील पांढरी पुल येथे जिल्हाव्यापी आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता.मेळाव्यात प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर आरक्षण प्रश्नी सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्ष व हेळसांडीबाबत प्रचंड रोष व्यक्त होऊन त्याचे रूपांतर उद्रेकात झाले होते.संतापलेले हजारो कार्यकर्ते नगर-औरंगाबाद रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करू लागले.या ठिकाणी संतप्त जमावाने प्रवाशांना बस मधून खाली उतरवून एशियाड बस पेटवली व इतरही बसेसची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती.


या प्रकरणी सोनई,ता.नेवासा जि.अहमदनगर पोलीस स्टेशन येथे दि.5 ऑगस्ट 2008 रोजी भा दं वि कलम 353,143,146,147,341,336,435,427,109 कलम 7, सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम 3 व मुंबई पो का क 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या आंदोलनात शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर,आदीनाथ काळे,कोपरगाव नगरपालिकेचे बांधकाम सभापती बाळासाहेब आढाव,नगरसेवक राजेंद्र वाकचौरे,विनय भगत,दिपक वाजे,सतीश थोरात,सुधीर गायकवाड,रमेश मोकाटे,गणेश चोथे,सोमनाथ मोकाटे,राजेंद्र चव्हाण यांचेवर गुन्हा दाखल झाला होता.सदर न्यायालयीन खटल्याची सुनावणी नेवासा कोर्टातील प्रथम वर्ग न्यायाधिश सौ.एम वाय डोईफोडे यांचेपुढे झाली.

प्रत्यक्षदर्शी साक्षिदार व इतर पुरावे तपासण्यात आले.परंतु सदर कार्यकर्त्यांविरोधात सबळ पुरावा न आढळल्यामुळे सर्व 12 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले.कार्यकर्त्यांतर्फे अँड.कारभारी वाखुरे,अँड किशोर ढेरे, अँड स्वप्निल सोनवणे, अँड मयूर वाखूरे यांनी काम पाहीले.सामाजिक बांधिलकीतून हा खटला चालविणार्या या सर्व विधिज्ञांचे सकल मराठा समाजातून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत अथकपणे लढा चालूच राहील.सरकारने आरक्षण व इतर मागण्यांबाबत मराठा समाजाच्या संयमाचा आणखी अंत न पाहता लवकरात मागण्या मान्य कराव्यात अशी प्रतिक्रिया यावेळी या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.