गावाच्या विकासाठी गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रपणे कामे करावे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील नेप्ती येथे विविध विकास कामाचे भूमीपुजन करुन, वृक्षलागवड व संवर्धन सप्ताह निमित्त वृक्षरोपण करण्यात आले. तसेच मागासवर्गीय कुटूंब व दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप सरपंच सौ.कविता अंबादास पुंड यांच्या हस्ते झाले. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच नंदू जाधव तर यावेळी उपसरपंच वैजंता जपकर, मीरा जपकर, किसन (देवा) होले, रामदास फुले, वसंत पवार, ग्रामसेविका उज्वला पवार, अंबादास पुंड, सुरेश कदम, मधुकर कदम, संजय जपकर, नंदू जाधव, फारुक सय्यद, जावेद सय्यद, प्रा.एकनाथ होले, मिठूभाई सय्यद, दिलीप होळकर, रामराव कांडेकर, अशोक जपकर, कुमार जपकर, बाबासाहेब जाधव, मच्छिंद्र होळकर, साहेबराव 

कदम, सुनिल आल्हाट, सोमनाथ कदम, दिनेश कदम आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच कविता पुंड म्हणाल्या की, नेप्तीत विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या घरापर्यंन्त पोहचविण्यासाठी प्रयत्न चालू आहे. राजकारण हे निवडणुकीपुर्ती मर्यादीत ठेवून, गावाच्या विकासाठी गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रपणे कामे करावे. गावाच्या सर्वांगीन विकासासाठी नेहमीचे कटीबध्द राहणार असल्याचे सांगून, विकासकामात खोडा घालणार्‍यांना ग्रामस्थांनी खड्यासारखे दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
नेप्तीत 2 लाख 45 हजार रुपये अंदाजे खर्च असलेल्या मुस्लिम कब्रस्तान संरक्षक भिंतच्या (वॉल कम्पाऊंड) कामाचे भुमीपूजन करण्यात आले. चौदावे वित्तआयोग, मागासवर्गीय अनुदान तर महिला व बाल कल्याण निधीतून पत्रे व इतर साहित्य खरेदीसाठी 1 लाख 72 हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटप सरपंच पुंड यांच्या हस्ते लाभार्थींना करण्यात आले. किशोर कदम या दिव्यांग व्यक्तीस तीनचाकी सायकलसाठी धनादेश देण्यात आला. तसेच गावातील स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia


ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS & Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Blogger द्वारा समर्थित.