बुधवारी 'कॅण्डल मार्च' कोपर्डी घटनेस एक वर्ष पूर्ण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघृणपणे खून केल्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण होत असल्याने बुधवार दि. १२ रोजी सायंकाळी ६ वाजता दिल्लीगेट ते चौथे शिवाजी महाराज हुतात्मा स्मारक असा कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. 


पीडित मुलीला त्याद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून या कॅण्डल मार्चच्या आयोजनासाठी ओम गार्डन येथे सकल मराठा समाजाच्या संयोजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.मानवतेला काळिमा फासणाऱ्या कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेस एक वर्ष पूर्ण होत आहे. 

या घटनेचे राज्यासह देश-परदेशात तीव्र पडसाद उमटले होते. मराठा समाज लाखोंच्या संख्येने मूक मोर्चाद्वारे या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरला होता. या घटनेस आता वर्ष पूर्ण होत असून, यानिमित्त नगरमध्ये कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

दिल्लीगेट येथून मार्चला सुरूवात होणार असून हुतात्मा स्मारक येथे मार्चची सांगता होणार आहे. त्याचबरोबर गुरूवार दि. १३ रोजी कोपर्डी येथे पीडित मुलीस श्रध्दांजली वाहण्यात येणार असून मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या नियोजनाबाबत तसेच समाजातील विविध प्रश्न व भविष्यातील वाटचालीबाबत आढावा घेण्यात येणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------



Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia


ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS & Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Blogger द्वारा समर्थित.