राष्ट्रवादीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी मोटे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्‍यातील वडाळा बहिरोबा येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मच्छिंद्र मोटे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखान्याच्या सभागृहात नेवासा तालुक्‍याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी मोटे यांची निवड केली.

विलास मोटे हे गेल्या 20 वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. ते ज्या गटाकडे असतात त्या गटाकडे वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीची सत्ता राहिल्याचे आजवर पहावयास मिळाले आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने वडाळा बहिरोबा गावचे राजकीय समीकरण बदलणार आहे.

निवडीप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, अशोक चौधरी, दिलीप लांडे, धनंजय कडूभाऊ, निखिल मोटे, सुभाष लव्हाटे, काकासाहेब नरवडे, नाथाभाऊ नवथर, वसंत देशमुख, आदी उपस्थित होते.


-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.