....तर दोन महिन्यानंतर राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संघटनेत विस्कळीतपणा आल्याने संघटना पातळीवर फेरबदल करण्याची आवश्‍यकता काही पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे व्यक्‍त केली होती. त्यानुसार जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्यासह अनेक पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले होते. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात बदलाची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. परंतु, संघटनात्मक आढावा घेण्यात आल्यानंतर घुले टिमला आता दोन महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

 या दोन महिन्यांत सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड व तालुकानिहाय बैठका घेऊन त्याचा अहवाल देण्याचे आदेश पवारांनी दिले आहे. ते झाले नाही तर संघटनात्मक बदल करण्याचे स्पष्ट केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.