शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहिर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच नवीन जम्बो कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून, यामध्ये शहर व उपनगरातील युवकांना संधी देण्यात आली आहे. सर्व समावेशक कार्यकारणीत सर्व स्तरातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये 24 उपाध्यक्ष, 21 सरचिटणीस व 20 चिटणीस पदांचा समावेश असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


दहावीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असून, लवकरच सर्व महाविद्यालयांना भेटी देवून सदर प्रश्‍ना संदर्भात प्राचार्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे प्रा.विधाते यांनी स्पष्ट केले व शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी बाबासाहेब गाडळकर, प्रकाश भागानगरे, मारुती पवार, रोहित शिंदे, दिलदारसिंग बीर, सारंग पंधाडे उपस्थित होते.

नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे - 

शहर उपाध्यक्ष- बाबा गाडळकर, प्रकाश भागानगरे, दिलदारसिंग बीर, सुमतीलाल कोठारी, कुमार नवले, फारुक रंगरेज, शाम भिंगारदिवे, राहुल पाटोळे, पंकज कर्डिले, बाळासाहेब चौरे, नंदू राऊत, निलेश खरपुडे, सोपान कदम, गौतम भांबळ, भाऊसाहेब उडाणशिवे, संजय सागावकर, दिपक जाधव, बजरंग भुतारे, रवी भुतकर, वैभव सुडके, सतीश ढवण, सुधाकर गव्हाणे, भाऊसाहेब इथापे, छबुराव कांडेकर.

सरचिटणीस - अ‍ॅड.मंगेश सोले, प्रा.बबन गाडेकर, अजय दिघे, सुदाम गांधले, मारुती पवार, रमेश बाबर, राहुल गाडळकर, श्याम सानप, संतोष आठरे, मोहंमद कमाल शेख, अशोक नांदुरकर, वसंत शिंदे, रशिद शेख, प्रशांत पगारे, दिपक खेडकर, चेतन शेलार, विशाल बेलपवार, श्री तळेकर, संजय लोखंडे, डॉ.अशोक भोजने, मनिष भंडारी.

चिटणीस - अ‍ॅड.रवी चौधरी, महेश गोंडाळ, मयुर भापकर, नित्यानंद कांबळे, अनिल पालवे, कैलास शिंदे, अ‍ॅड. अजीज इनामदार, अ‍ॅड. वसिम सय्यद, अ‍ॅड. राजीव शितोळे, प्रमोद गांधी, ओम पांडे, राजेंद्र कापरे, सतीष मुंडलीक, मोहन गाडे, सुरेश आडसुळ, विठ्ठल शिरसाठ, आबासाहेब शिंदे, लतिफ बेग, शंभुराजे कदम, रज्जाक बागवान. प्रसिध्दी प्रमुख रोहीत शिंदे, खजिनदार कार्तिक भगत. तसेच निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व नगरसेवकांचा समावेश आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.