उत्कृष्ट नेटवर्क असेल, तर कार्यकर्त्यांची रेंज वाढते - आ.अरुण जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजकारणात उत्कृष्ट नेटवर्क असेल, तर कार्यकर्त्यांची रेंज वाढते. राष्ट्रवादीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची रेंज वाढली आहे. जीवनात मनुष्याने पाय जमीनीवर ठेवून काम करावे. मनुष्याची किंमत समाज ठरवित असतो. राष्ट्रवादीचे काम एकजुटीने चालू असून, शहर जिल्हाध्यक्षपदाची प्रा.विधाते यांच्या रुपाने निवड सार्थ ठरली असून, एक नवीनवर्ग पक्षाशी जोडला गेला आहे. पुढच्या वर्षी होणार्‍या मनपाच्या निवडणुक प्रा.विधाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे वक्तव्य आ.अरुण जगताप यांनी केले.


माळीवाडा, बारातोटी कारंजा येथील शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ.जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर तर याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, संभाजी पवार, संजय झिंजे, प्रा.अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे, हनिफ जरीवाला, ज्ञानदेव पांडूळे, सुमतीलाल कोठारी, प्रा.शिवाजी विधाते, गजानन भांडवलकर, अमित खामकर, प्रकाश भागानगरे, ज्ञानेश्‍वर रासकर, दत्तात्रय राऊत, बाबासाहेब गाडळकर, वैभव ढाकणे, प्रा. भाऊसाहेब कचरे, अजय दिघे, मारुती पवार, रोहित शिंदे, साहेबान जहागीरदार, मयुर विधाते, पै.पवन भिंगारदिवे, रेखा जरे, साधना बोरुडे, संजय सागावकर, अनिल विधाते, निलेश खरपुडे, फारुक रंगरेज आदि उपस्थित होते.

पुढे आ.अरुण जगताप म्हणाले की, शहराच्या विकासकामासाठी आनलेल्या निधीस विरोधकांनी हरकती घेतल्या. सत्ताधार्‍यांनी विकास कामासाठी अनुदान आनून दाखवावे. सर्वसामान्यांचे काम करणार्‍यांना जनता स्विकारते. कार्यकर्त्यांच्या जीवावर दुसर्‍यांदा विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. प्रा.विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राष्ट्रवादीचे कार्य उत्तम चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात प्रा.माणिक विधाते यांनी पक्षनिष्ठेने आ.अरुण जगताप व दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. पक्ष संघटन व सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून काम चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.अरविंद शिंदे यांनी शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम सत्ताधारी करत आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण केलेल्या कामाची माहिती जनतेला देण्याची गरज असल्याचे सांगितले. 

अभिषेक कळमकर म्हणाले की, सर्व सामान्यांना घडविण्याचे कार्य प्रा.माणिक विधाते यांनी केले. सेवानिवृत्तीच्या पेन्शनमधील रकमेची ठेव ठेवून, बारावीच्या गरजू विद्यार्थ्यांची दरवर्षी परिक्षा फी भरण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. मागील 25 वर्षाच्या जातीय राजकारणाने युवकांच्या आयुष्याचे वाटोळे झाल्याचा आरोप नांव न घेता माजी आ.राठोड यांच्यावर केला.

संजय झिंजे यांनी युवक संघटनचे उत्तम कार्य आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून चालू आहे. राष्ट्रवादीचा संघर्ष जातीवादी शक्तींबरोबर असल्याचे सांगून, प्रा.विधाते यांच्या सरळ स्वभावाचा उल्लेख केला. अविनाश घुले म्हणाले की, शहरात सत्ताधार्‍यांपेक्षा युवकांची ओढ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आ.अरुण जगताप व दादाभाऊ कळमकर यांच्या जनसंपर्कामुळे तर संग्राम जगताप यांच्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर शहरासह उपनगरांचा झपाट्याने विकास होत आहे. संग्राम जगताप यांनी माळीवाडा भागासाठी आपल्या निधीतून झुकते माप दिले असून, विकास काय असतो? याची प्रचिती पंचवीस वर्षानंतर नगरकरांना पहावयास मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

दादाभाऊ कळमकर म्हणाले की, जातीय राजकारणाद्वारे युवकांच्या माथी अजूनही दंगलीचे खटले आहे. तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम मागच्या 25 वर्षात झाले. एमआयडीसीतील कारखानदारी मोडीत काढण्याचे काम शिवसेनेने केले. 25 वर्षे मागे वळून पाहताना शहरातील हजारो युवक बेरोजगारीच्या खाईत लोटल्याचे वास्तव चित्र सर्वांपुढे आहे. 

आ.संग्राम जगताप यांच्या निधीतून व राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याने शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली व चालू देखील आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांचे नारळ फोडण्याचे काम सत्ताधारी करत आहे. 

राज्यासह केंद्रात सत्ता नसताना देखील विकासात्मक कामे आ.संग्राम जगताप यांच्या निधीतून होत असून, सेना-भाजप मात्र आरोप प्रत्यारोपातच गुंतले असल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी आसाराम रासकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.नागेश गवळी यांनी केले. आभार प्रकाश भागानगरे यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध विभाग, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.