मांडवगण येथे महारुद्र स्वाहाकार पुर्णाहुतीस दहा हजार भाविकांची उपस्थिती.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मांडवगण येथील श्री. सिद्धेश्वर महाराज ब्राम्हण समाज सेवा संस्थेच्या वतीने श्री.सिद्धेश्वर मंदिर येथे महारुद्र स्वाहाकार १० जुलै रोजी सुरु झाला. यानिमित्त दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी, पूजापाठ संपन्न झाले. प्रथमच घनपाठ पारायणही संपन्न झाले. दु:ख निवारणाचा भव्य यज्ञ आहुतीचा हा सोहळा विश्वकल्याण व पर्जन्यवृष्टी वृद्धी साठी करण्यात आला.


नगरचे आचार्य वेदमूर्ती महेशजी रेखी, नगर, अमरावती, व आळंदी येथील पाच घनपाठी गुरुजी व सहकारी ब्राम्हण साधकांच्या मंत्रोच्चारात- यजमान श्री. व सौ.श्रीकांतजी बडवे, श्री. व सौ.अॅड.जयंत भापकर, श्री.व सौ.अॅड.प्रकाश गटणे यांच्या हस्ते पुर्नाहुतीचा कार्यक्रम दहा हजार भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, घनश्याम शेलार, प्रमोद जगताप व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यज्ञ पुर्णाहुती संपन्न होताच पावसाने हजेरी लावून वातावरण चैतन्यमय केले. हजारो भाविकांच्या साक्षीने संपन्न झालेल्या या महारुद्र स्वाहाकार सोहळ्याची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. श्री.सिद्धेश्वराच्या कृपेने ही परंपरा अखंड सुरु राहील यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभरात राबविण्यात येतील अशी माहिती. श्री.सिद्धेश्वर महाराज ब्राम्हण समाज सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आली.

उपस्थित भाविकांनी असा सोहळा दरवर्षी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोहळा यशस्वितेसाठी संयोजन समितीतील अॅड.सुधीर भापकर, रविकाका बडवे, सुभाष पोखरणा, अजय लांडगे, मनोज आबा देशमुख, प्रदीप सप्तर्षी, निलेश लांडगे या व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचा श्री सिद्धेश्वराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. रविकाका बडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.