अकोळनेर शिवारात अपघातात एक ठार एक जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील अकोळनेर शिवारात रविवारी(दि.१६) दुपारी २.३० च्या सुमारास अकोळनेरहून नगरकडे येत असलेली चारचाकी पोलला धडकल्यामुळे भीषण अपघात होवून यामध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोळनेर शिवारातील तळ्यात-मळ्यात परिसरात रविवारी दि. १६ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास मारूती सुझुकी इरटीगा या चारचाकी गाडीचा (एमएच १६ बीवाय ३१३१) भीषण अपघात झाला.

ही गाडी पोलला धडकल्यामुळे यामध्ये सारंग विठ्ठल जाधव (रा. जाधव मळा, नगर) यांचा मृत्यू झाला तर रोहन किशोर डागवाले (रा. डागवाले मळा, नगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सारंग जाधव यांच्या मृत्यूची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला होता. 

त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्रीच्या सुमारास ते कुटुंबियांकडे देण्यात आले होते. जाधव यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यातील जखमी असलेले रोहन डागवाले हे नगरसेवक किशोर डागवाले यांचे सुपुत्र असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.