पाण्याच्या वादातून महिलेस लाकडी दांडक्याने मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाटा येथील मॉडर्न रेसिडेन्सी सोसायटी येथे सोमवारी (दि. १०) दुपारी ४ वाजता हौदातून पाणी भरताना झालेल्या वादातून एका महिलेस तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला. 


याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची माहिती अशी की, येथील एक विवाहीत महिला हौदातून पाणी भरत असताना पाण्याची बादली राधा दिनेश ठाकूर या महिलेच्या पाण्याच्या बादलीला घासली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. 

त्या वादातून दिनेश ठाकूर, राधा ठाकूर, अन्य एक अनोळखी व्यक्तीने त्या महिलेस शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.