अहमदनगर कॉलेज वाणिज्य विभाग प्रमुखपदी डॉ.डी.बी.मोरे यांची नियुक्ती


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर कॉलेजच्या वाणिज्य विभाग प्रमुखपदी डॉ.डी.बी.मोरे यांची डॉ.भा.पा.हिवाळे संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली . त्या बद्दल प्राचार्य डॉ. आर.जे बार्नबस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य एन. आर. सोमवंशी ,रजिस्टार ए.वाय. बळीद , संगणक विभाग प्रमुख प्रा. सय्यद रज्जाक, क्रीडा प्रशिक्षक सेव्हिओ वेगास उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. बार्नबस यांनी डॉ. मोरे यांचे आभिनन्दन केले , वाणिज्य विभागाची जबाबदारी मोठी असून आज विदयार्थी मोठ्या संख्यने वाणिज्य क्षेत्रा कडे वळत आहेत . डॉ. मोरे ही जबाबदारी अतिशय उत्तम रित्या पार पाडतील ,तसेच त्यांना हवे ते सहकार्य सतत दिले जाईल.

डॉ .मोरे यांनी त्यांच्या या निवडी बद्दल संस्थेचे व सर्वांचे आभार मानले, आजपर्यंत प्राचार्यांचे मार्गदर्शन व सर्व सहकार्यांची लाभलेली साथ आशीच राहील व विभागाचे नावलौकिक होईल आसे कार्य या पुढी काळात होईल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ.डी बी.मोरे हे नगर कॉलेजचे माजी विदयार्थी असून १९८७ मध्ये ते प्राध्यापक म्हणून कॉलेजला जॉईन झाले.१९९८ मध्ये ते पीएचडी झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत अनेक विध्यार्थ्यांनी पीएच डी प्राप्त केली आहे. २००७ पासून बीबीए विभागाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी केलेलं काम व अनभुव लक्षात घेता संस्थेने त्यांची वाणिज्य विभाग प्रमुख पदी नुकतीच निवड केली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.