#अहमदनगर सोशल मिडीया - खासदार लोखंडेना नेटीझन्स ने झोडपले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर येथे पत्रकारांसोबत बोलताना शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी इतक्या मोठ्या मतदारसंघात कोणाला कोठे वेळ देऊ ? असा सवाल जनतेलाच केला. मात्र हि बातमी 'अहमदनगर लाईव्हच्या' माध्यमातून सोशल मिडीया वर येताच नेटीझन्स ने लोखंडेना चांगलेच झोडपले.

'शिर्डी मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ, सुमारे ९०० गावे येतात. प्रचंड लोकसंख्या आहे. शिवाय लोकसभेत वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मतदार संघात कसा राहणार ? लोकांना खासदाराने आपल्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावावी, असे वाटत असते. मला हे शक्य होणार नाही, अशी मुक्ताफळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शनिवारी उधळली होती.

सोशल मिडीया वर नेटीझन्स खासदार लोखंडे यांच्या या विधानावर मात्र बरसले, लोकांना खासदाराने आपल्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावावी, असे वाटत असते. मला हे शक्य होणार नाही, असे लोखंडे बोलले होते त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना  'जनतेच्या कामासाठी मतदार संघात फिरायला वेळ भेटत नसेल तर मिळणारे भत्ते, वेतन ही स्वीकारायला नको, तसेच निवडणुकीत उभे राहताना समजल नाही ? मतदार संघ मोठा आहे की लहान ? असे सवाल नेटीझन्स ने फेसबुक च्या माध्यमातून मांडले.

वाचा काही निवडक प्रतिक्रिया - 


             


-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.