भाजप प्रवेशासाठी उशीर नको ! माजीमंत्री मधुकर पिचड यांचा विखेंना टोला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पूर्वीच्या सरकारमुळे निळवंडे धरणाला उशीर झाला, म्हणणाऱ्याची परिस्थिती अशी आहे की मुलाला घरातून वेगळे व्हायचे असले की तो बायकोला म्हणतो घरात भांड्याची आदळ-आपट कर. म्हणजे वेगळे होता येईल. तसा प्रकार असून त्यांना भाजपत जायचे असेल तर त्यांनी लवकरात लवकर जावे. उगाच अगोदरच आगपाखड करू नये, असा टोला माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता लगावला.


अकोले तालुक्‍याच्यातील पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन रविवारी माजीमंत्री मधुकर पिचड,आमदार वैभव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विखे यांच्यावर टीका केली. 

पुनर्वसनासाठी काय योगदान दिले हे सांगावे.
विखे यांचे नाव न घेता टीका करताना ज्येष्ठ नेते पिचड म्हणाले की, पूर्वीच्या सरकारने काही केले नाही. पूर्वीच्या सरकारमुळे निळवंडेला उशीर झाला. त्यामुळे टाहो फोडणाऱ्यांनी अगोदर पुनर्वसनासाठी काय योगदान दिले हे सांगावे. एकाही धरणग्रस्ताला आपल्या संस्थेत नोकरीला घेतले काय हे त्यांनी सांगावे. 

आता कालवे जमिनीच्या खालून की वरून हा वादही त्यांनीच सुरू केला. त्यांच्यामुळेच निळवंडे धरणाला खरा उशीर झाला आहे. कारण त्यांनी पुनर्वसनाला मदतच केली नाही. त्यांना भाजपत जायचे आहे. मात्र त्यांनी अशी आगपाखड करण्यापेक्षा भाजपत जायचे असेल तर लवकरात लवकर जावे. 

अजितदादांच्या सहायाने अशक्‍य काम पूर्ण…
आमदार वैभव पिचड म्हणाले की, दोन वर्षापूर्वी तालुक्‍यात कुणालाच विश्‍वास बसत नव्हता की हे धरण होईल. मात्र पिचड साहेबांनी अजितदादांच्या साथीने हे अशक्‍य काम करुन दाखविले. साहेबांनी मुळा बारमाही करण्याचे स्वप्न पूर्ण केले. 

मुळा परिसराचे पाण्याचे भाग्य पिचड साहेबांमुळे उजळले.
गायकर म्हणाले की, मुळा परिसराचे पाण्याचे भाग्य पिचड साहेबांमुळे उजळले आहे. अनेक वर्षाची तपश्‍चर्या पूर्ण झाली आहे. दोन वर्षापासून धरण भरत आहे. पुढील पिढ्या साहेबांना विसरणार नाहीत, असे अजरामर काम त्यांनी केले आहे.

यावेळी आ. पिचड यांनी बोटीतून धरणाच्या परिसराची पाहणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, जि. प. सदस्य रमेश देशमुख, उपअभियंता संदीप देशमुख, शाखा अभियंता नानासाहेब खर्डे, पिंपळगाव खांडच्या सरपंच संगीता हासे, कोतूळच्या सरपंच अनुसया धराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने, अल्पसंख्यांक अध्यक्ष अन्सार पटेल, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, अगस्ती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले, भाऊसाहेब हाडवळे, भाऊसाहेब बराते, डॉ. सुभाष गोडसे, रोहिदास भोर, नामदेव भोर, भाऊसाहेब पवार, भाऊसाहेब शेटे, शिवाजी वाल्हेकर, किसन पारधी, भानुदास डोंगरे, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब ढोले, दगडू हासे, विठ्ठलराव डुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.