मतिमंद मुलीवर अत्याचाराच्या घटनेतील आरोपीस पोलीस कोठडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव येथील 20 वर्षीय मूकबधिर, मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेतील आरोपीला कोपरगाव पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अत्याचाराच्या घटनेने तालुक्‍यासह जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी या नराधमाला अटक करून त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.

न्यायालयाने आरोपीला 10 जुलैपर्यंत अधिक तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. अत्याचार करणाऱ्यामध्ये आणखी कोण सामील आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.