जि.प च्या शाळेत शिक्षक नेमा, नाही तर वर्ग तरी बंद करा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्य सरकारच्या अधिकाराखाली असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक तरी नेमा, नसता 6 वी, 7 वी, व 8 वीचे वर्ग तरी बंद करा, गोरगरीबांच्या मुलांचे वर्ष वाया कशापायी घालवता असा जळजळीत सवाल जिल्हापरिषद सदस्य राजेश परजणे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांना पाठविलेल्या पत्रातुन केला आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळेत 6 वी, 7 वी व 8 वीचे वर्ग सुरू आहेत. मात्र बहुतांशी शाळेत गणित व विज्ञान या विषयासाठी शिक्षकच नाहीत. त्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य व गोरगरीब कुटूंबातील आहेत. त्यामुळे ते कुठे बाहेरही शिक्षण घेऊ शकत नाही. तसेच गणित व विज्ञान हे दोन विषय महत्त्वाचे असल्याने या मुलांना भविष्यात शिक्षण घेतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांत चिंता व नाराजी व्यक्‍त होत आहे.

यापूर्वीही सरकारकडे या विषयांसाठी शिक्षकांची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही मागणी पूर्ण झालेली नाही. अशी खंत पत्रातुन परजणे यांनी व्यक्‍त केली आहे. या मागणीचा गांभिर्याने विचार करून तातडीने वरील विषयाची आर्हता प्राप्त शिक्षक नेमण्यात यावेत. वर्ग बंद करावेत मात्र सर्वसामान्य व गोरगरीब मुलांचे शैक्षणीक नुकसान करू, नये असेही परजणे यांनी पत्रात शेवटी नमूद केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.