कोपर्डीमध्ये निर्भयाचा प्रतीकात्मक पुतळा बसविल्याने तणाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कोपर्डी प्रकरणातील पिडीत मुलीच्या घरासमोर बांधण्यात आलेल्या समाधीवर काल रात्री उशिरा तिचा प्रतीकात्मक पुतळा बसविण्यात आला. याची माहिती सकाळी समजताच याबाबत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर कुटुंबीयानी सध्या तरी या पुतळ्याला कापडी आच्छादन घालून झाकून ठेवले असून याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 


यावेळी समाधीलाही विरोध होत असेल तर आम्ही तेथे मंदिर उभारू असे मत तिच्या आईने व्यक्त केले. सध्या कोपर्डीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भयावर झालेल्या अमानुष अत्याचार व तिच्या हत्येला काल एक वर्ष पूर्ण झाले या दिवशी तिचे स्मारक उभारण्याचा मनोदय कुटुंबीयांनी अगोदरच जाहीर केला होता.

त्याप्रमाणे त्यांनी आपल्या राहत्या घरासमोरच एक चबुतरा हि बांधला होता त्यावर पुतळा बसवता येईल असा छोटा खांब हि उभारण्यात आला होता मात्र या निर्भयाच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडने पत्रक काढून विरोध केला व हे स्मारक उभारण्याचा घाट घालणार्या भय्यू महाराज यांना थेट आव्हान देत स्मारक उभारण्याचा प्रयत्न केल्यास याठिकाणी संघर्ष अटळ असल्याचे जाहीर केले होते.

 त्यामुळे काल वर्षपूर्तीप्रसंगी कुटुंबीयांनी हे स्मारक नसून आमच्या मुलीची समाधी आहे व ग्रामीण भागात अशी समाधी बांधण्याची रूढी परंपरा आहे असे जाहीर करून समाजातील रोष मिटविण्याचा प्रयत्न केला याच बरोबर काल या ठिकाणी भय्यू महाराज येऊन या स्मारकाचे अनावरण करणार होते व त्याचे प्रबोधन हि होणार होते मात्र त्यांनी संघर्ष टाळण्यासाठी येथे येणेच टाळले.

त्यामुळे कोपर्डी येथे काल या समाधी स्थळावर तिच्या प्रतिमेला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला. कोपर्डीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या समाजाच्या लोकाचा मेळावा हि झाला व सर्व जण आपल्या गावी परतल्या नंतर रात्री १०-३० ते ११ च्या दरम्यान या निर्भयाचा पुतळा नाशिक येथून आणण्यात आला व तो परिवारातील सदस्याच्या उपस्थितीत बसविण्यात आला.

याची माहिती सकाळी वार्यासारखी पसरली व सर्वत्र पुन्हा उलट सुलट चर्चेला उधाण आले. याठिकाणी कालच पोलिसाचा मोठां बंदोबस्त होता तो तसाच कायम ठेवण्यात आला. या पुतळा बसविण्याच्या कृतीला विरोधाची शक्यता लक्षात येताच या पुतळ्या भोवती चौकोनी लोखंडी फ्रेम तयार करून त्यास पांढर्या कपड्यानी झाकण्यात आले. यामुळे आज पुन्हा कोपर्डी मधील वातावणात अस्वस्थता पसरली होती.

जो तो स्मारक असावे कि नसावे, पुतळा असावा कि नसावा यावरच चर्चा करताना दिसत होता. याबाबत निर्भयाच्या कुटुंबीयाची भेट घेतली असता तिच्या आईने म्हटले कि खेडेगावात समाधी बांधण्याची प्रथा असते, कुणीही यामध्ये राजकारण अथवा वाद निर्माण करू नये आज पर्यत समाजाने खूप मदत केली आहे आमच्या लाडकीने पूर्ण समाजाला एकत्र केले आहे.

त्यामुळे पारिवारिक विचाराने आम्ही आमच्या वैयक्तिक जागेत समाधी उभारली आहे परतू त्यास हि विरोध होत असल्यास आमच्या लाडकीच्या स्मृतीसाठी तिथेच मंदिर उभारण्याचा विचार आहे.

भय्यूजी महाराज यांनी मला बहीण मानले आहे त्यामुळे या कामात त्यांनी मदत केली आहे. तर लालासाहेब सुद्रिक यांनी कोपर्डी घटनेचा निकाल लागल्यानंतर सर्व जण मिळून स्मारक अथवा समाधी बांधू परंतु कुटुंबांच्या विषय असल्याने आता मंदिर उभारण्याचा विचार करत आहोत.

मुलीचे स्मारक पाहून आईचे अश्रू अनावर.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.