श्रीगोंदा तालुक्यातील 'ती' तीन मुले सापडली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी तीन मुले ज्ञानेश्वर संतोष नागे, हृषीकेश अशोक गावडे व तुषार विश्वनाथ गावडे (सर्व रा.काष्टी,ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी आहेत. मंगळवार दि.११ रोजी सकाळी सहा वाजता घरातून खाजगी क्लासला जातो असे सांगून, घरातून निघुन गेले आणि ही मुले गायब झाली. 


म्हणून पालकांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपासाची सुत्रे वेगात फिरवून पुणे, ठाणे, मुंबई येथे खबर दिली. तोपर्यत येथील अर्जुन रामकिसन गावडे यांनी नगर येथील चाईडलाईन केंद्र समन्वक प्राची सोनवणे अमोल धावडे, संकेत होले यांना संपर्क करुन मुलं गायब झाल्याची माहिती दिली. 

त्यांनी मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) रेल्वे चाईड लाईनचे मुख्य पौर्णिमा मोरे,सचिन बिराडे, किरण नगरे, रामेश्वर भांड यांनी श्रीगोंदा पोलिसांच्या मोबाईल लोकेशनच्या सांगण्यावरून ठाणे, छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. आणि ही दुपारी दोन वाजता ही मुलं जीवाची मुंबई करुन पुन्हा छत्रपती शिवाजी टर्मिनल्सवर रात्री अकरा वाजता आली. 

त्यांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या पथकाने ताब्यात घेऊन, डोबरी येथील बालसुधारगृहात दाखल केले.आणि मुलं सापडल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना दिली. त्यानंतर मुलांचे पालक रात्री उशिरा पो.नि.पोवार यांनी एक पोलिस कर्मचारी देवून मुंबईत पोहचले. 

परंतु येथील कोर्टाला सुट्टी असल्यामुळे त्यांना सोडले नाही. परंतु मुल मात्र सुखरुप आहेत. या तपासात श्रीगोंदा पोलिस,नगर व मुंबई येथील चाईल्डलाईनच्या मदतीने बारा तासात मुलांचा शोध लावला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.