बाभूळगाव शिवारात सापडलेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील बाभूळगाव शिवारात सापडलेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटली असून हा इसम सांगली जिल्हयातील असून तो वारीमध्ये गेला होता आज त्याचे भावांनी कर्जत येथे येऊन ओळख पटवली व प्रेत ताब्यात घेतले. यामुळे एका प्रकरणात पोलिसांनी मोठा सुस्कारा सोडला आहे. 

कर्जत तालुक्यातील बाभूळगाव टाकळी रोडवर दोन दिवसापूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा खून करून प्रेत रस्त्याचे कडेला टाकल्याचे लक्षात आले होते. तो कोण असेल याचा शोध लावणे पोलीसापुढे मोठे आव्हान होते मात्र कर्जत तालुक्यातून सदर मृत व्यक्तीचे फोटो व्हाटसवरून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले व हे फोटो सांगली जिल्ह्यातील त्याच्या भावाने पाहून त्याची ओळख पटली.

सांगली जिल्ह्या जत तालुक्यातील वायफळ येथील नितीन अर्जुन यादव वय 33 असे या मयताचे नाव असून तो गावातील भोजलिंग महाराज याचे दिंडीत पंढरपूर येथे वारीसाठी गेला होता वारीतील सर्व लोक परतले तरी नितीन घरी न आल्याने त्याचे वडिलांनी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग दाखल केले होते.

याच दरम्यान त्याचा भाऊ प्रदीप अर्जुन यादव यास व्हाटसअपवर आपल्या भावाचा फोटो दिसला तो त्याने ओळखला व लगेच कर्जत पोलिसाशी संपर्क साधला आज सकाळी प्रदीप यादव सह त्याचा दुसरा भाऊ कल्पेश यादव याचे सह त्याचे भावकीतील चार पाच जनासह कर्जत येथे आले त्यांनी फोटो मध्ये आपला भाऊच असल्याचे सांगून शीतगृहात ठेवलेला मृतदेह पाहिला व त्याची खात्री पटली याबाबत त्यांनी आपले जबाब पोलिसाकडे नोंदवून सदर मृतदेह ताब्यात घेतला.

मयत नितीन याचे मागे पत्नी व दोन मुले याचे सह आई वडील असा परिवार असून नातेवाईकानि आमचे कोणाशी वैरच नसल्याने कोणावर हि संशय व्यक्त केलेला नसून त्यामुळे या खुनाचा तपास लावण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वसंत भोये याचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रमोद भिंगारे हे करत आहेत.

कर्जत तालुक्यात दुर्गाव नंतर हि घटना पुढे आल्यानंतर एकप्रकारे कर्जत पोलिसावर तपास लावण्याचा दबाव आला होता त्यामुळे या घटनेतील मयताची ओळख पटल्याने एकप्रकारे पोलिसांनी सुस्कारा सोडला असून दुर्गाव प्रकरणाचा हि लवकरच छडा लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.