कर्जतमधील बेवारस प्रेताची ओळख पटेना.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यात सापडलेल्या अनोळखी पुरुषाचे प्रेतावर पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून या व्यक्तीची ओळख पटण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत विविध पोलीस स्टेशनच्या हरवलेल्या व्यक्तीच्या नोदी तपासल्या जाऊ लागल्या असून बीड व औरंगाबाद कडे पोलीस तपासासाठी रवाना झाले आहेत.


ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign


कर्जत तालुक्यातील बाभूळगाव टाकळी या रस्त्यावर उताराला एका मध्यमवयीन पुरुषाचा मृतदेह सापडल्याचे घटनेनंतर पोलीसासमोर या व्यक्तीची प्रथम ओळख पटविण्याची मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी वा ओळख पटू नये यासाठी मयताच्या अंगावर कोणताही कपडा ठेवलेला नाही.

मात्र या व्यक्तीच्या हातात काळ्या चमडयाच्या बेल्टचे टायटन कंपनीचे घड्याळ असल्याने हा सधन कुटुंबातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचा अथवा ओढणीने गळा आवळून याचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे हे करत आहेत. या प्रेताचे शवविच्छेदन कर्जत येथे न करता पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आले.

यासाठी कर्जतचे पोलीस कॉ. एच सी लोखंडे व पो. कॉ पी. सी इंगवले यांनी हि अत्यंत किचकट प्रक्रिया पूर्ण केली यामध्ये डी एन ए तपासले जाणार आहेत. सध्या दोन दिवस हे प्रेत कर्जत येथील डीपफ्रीज मध्ये ठेवले जाणार असून त्यानंतर ते जेथे सापडले त्या गावाच्या हद्दीत पुरले जाणार आहे.

तो पर्यत जर त्याची ओळख पटली तर त्याचे नातेवाईकाच्या ताब्यात देता येणार आहे. अनोळखी व्यक्तीची ओळख पटविणे हे अत्यंत जिकरीचे काम असले तरी आम्ही लवकरच या दोन्ही प्रकरणाचा छडा वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली लाऊ असा विश्वास तपासी अधिकारी भिंगारे यांनी व्यक्त केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.